मुंबई

बिबट्याच्या वावराने झोपेचे खोबरे

CD

माणगाव, ता.४(बातमीदार)ः तालुक्यातील कशेणे गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच रविवारी (ता.३) सीसीटिव्हीत पुन्हा बिबट्या दिसल्याने सणासुदीच्या काळातच ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
कशेणे गावात रात्रीच्या वेळी भक्षाच्या शोधात बिबट्या फिरताना दिसत आहे. गावातील जनावरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पण सणासुदीच्या काळात गावात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे लहान मुले, महिला यांचा वावर रात्री अधिक असणार असून, एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------------------------------
वनविभागाचे दुर्लक्ष
बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत वांरवार दिसत आहे. अनेक वेळा ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
------------------------------------
ग्रामस्थांच्या मागण्या
- बिबट्याच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवा.
- तातडीने पिंजरे लावावेत.
- रात्रीची गस्त वाढवावी.
- वनविभागाने तत्काळ कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Investment Returns : सोने गुंतवणुकीने दोन महिन्यांत तब्बल 28 हजारांचा परतावा; इराण-अमेरिका युद्धानंतरही भावात घसरण, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT