मुंबई

ऑनलाइन प्रवेेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे हाल

CD

वाडा, ता. ४ (बातमीदार) : ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रियेत बदल करत पूर्वीच्या ऑफलाइन प्रणालीऐवजी ऑनलाइन केली आहे. दुर्गम भागातील महाविद्यालयात प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर फरफट होत असल्याची पालकांची ओरड आहे. जवळ असलेल्या शाळेपेक्षा लांबच्या शाळेत जाताना खर्चाचा भार परवडत नाही.

चिंचघर येथील घ. बा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी उत्तीर्ण झालेल्या २१९ विद्यार्थ्यांपैकी कला शाखेत ३२ मुलांना, तर विज्ञान शाखेत २८ मुलांना तिस-या फेरीअखेर प्रवेश मिळाला. अजून १५९ मुले अकरावी प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ७३ टक्के, ओबीसी आरक्षण ७१टक्के, एस.टी.साठी ६२ टक्के, तर एस.सी.साठी ४६ टक्के आरक्षणावर प्रवेश बंद झाल्याने ऑनलाइन प्रक्रियेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी वंचित आहेत. पूर्वीप्रमाणेच आरक्षण ठेवून ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी आदिवासी समाजातील मुले वंचित राहू नयेत, म्हणून खासदार डाॅ. हेमंत सवरा यांनी शिक्षण मंत्र्याकडे केली आहे.

चिंचघर येथील कनिष्ठ महाविद्यालयाप्रमाणे वाडा तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.वाडा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले ही बहुसंख्य शेतमजूर व शेतकऱ्यांची सामान्य कुटुंबातील आहेत. ग्रामीण भागातील पालक गरीब व मोलमजुरी करणारे असल्याने बाहेरगावी खर्च करून प्रवास करू शकत नाहीत. म्हणून सरकारने ऑफलाइन प्रक्रिया राबवावी, असे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी सांगितले.

शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता
विद्यालयाच्या चार किमी अंतरावर हे विद्यार्थी पायी शाळेत येतात. खर्चासाठी त्यांच्याकडे फारसे पैसे नसतात, ऑनलाइन प्रक्रियेत त्यांचा क्रमांक वाडा, भिवंडी यासारख्या महाविद्यालयात लागले, तर त्यांना दिवसागणिक दोनशे रुपये प्रवासासाठी खर्च करावे लागतील. मजुरी करणारे पालक एवढा खर्च करू शकत नाहीत, म्हणून मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT