मुंबई

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाची देदिप्यमान कामगिरी

CD

युवा महोत्सवात वर्तक महाविद्यालयाची देदीप्यमान कामगिरी!
विभागीय फेरीत तब्बल २० पारितोषिके पटकावत यशाची परंपरा कायम
विरार, ता. ६ (बातमीदार) ः वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवात आपल्या कलेचा, बुद्धिमत्तेचा आणि सांस्कृतिक प्रतिभेचा प्रभावी ठसा उमटवला आहे. महोत्सवाच्या विभागीय फेरीत एकूण २० पारितोषिके मिळवली आहेत.
मिरा रोड येथील एल. आर. तिवारी शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या विभागीय फेरीत बोरिवली ते डहाणू या परिसरातील ३० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी घेतला होता. या स्पर्धेत वर्तक महाविद्यालयाने सहा प्रकारांमध्ये प्रथम, ११ प्रकारांमध्ये द्वितीय, तर तीन प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, नृत्य दिग्दर्शक भूषण पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी सांस्कृतिक विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक करत सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक वर्ग, मार्गदर्शक आणि विद्यार्थी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला असून, आता विद्यापीठ पातळीवरील अंतिम फेरीसाठी महाविद्यालय पूर्ण सज्ज झाले आहे. आगामी स्पर्धांमध्ये ही प्रतिभा उजळून निघेल, असा विश्वास सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. अमृता जाधव यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT