मुंबई

महापालिकेच्या सीबीएसई शाळांना शासन मान्यता

CD

महापालिकेच्या सीबीएसई शाळांना शासन मान्यता
आधुनिक शैक्षणिक सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या सीवूड सेक्टर ५० व कोपरखैरणे सेक्टर ११ येथील सीबीएसई माध्यमाच्या शाळांना शासनाकडून २०३० पर्यंतची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ही मान्यता मिळाल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विभागात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
महापालिकेने ४ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू केलेल्या शाळा क्रमांक ९३ (सीवूड) व ९४ (कोपरखैरणे) या सीबीएसई शाळा मध्यमवर्गीय पालकांच्या मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला प्रथम इयत्तेपासून सुरुवात झालेल्या या शाळांमध्ये आज पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग यशस्वीपणे चालवले जात आहेत.
या शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही युक्त सुरक्षा, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, पोषण आहार, क्रीडा व अन्य आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय गुणवत्तापूर्ण व प्रशिक्षित शिक्षकांचा मनुष्यबळ या शाळांचा खास ठळक गुणधर्म आहे. आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने या शाळांनी विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली आहे.
या दोन्ही शाळांना शासन मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांचे व शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांचे विशेष योगदान आहे.
................
''पीएम श्री शाळा'' म्हणून सन्मानित
विशेष म्हणजे कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ ही शाळा ''पीएम श्री शाळा'' म्हणून सन्मानित झाली आहे. यामुळे शाळेच्या राष्ट्रीय पातळीवरील दर्जालाही मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या व स्पर्धांमधील यश ही या शाळांच्या यशोगाथेची साक्ष आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीतील हा एक मानाचा तुरा ठरला असून पालिकेच्या शैक्षणिक धोरणांना मिळालेला हा विश्वासाचा ठसा आहे. पालिका आयुक्तांनी शाळांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT