मुंबई

रक्षाबंधन सणासाठी एसटीच्या जादा फेऱ्या

CD

रक्षाबंधन सणासाठी एसटीच्या जादा फेऱ्या
पेण, पनवेल, अलिबाग, नागोठणे, खोपोलीकरीता फेऱ्या
पेण, ता. ६ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिवहन विभागाने रक्षाबंधन सणासाठी महिलांची वाढती गर्दी लक्षात पेण स्थानकामार्फत एसटीच्या जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. यामध्ये पेण, पनवेल, अलिबाग, नागोठणे, खोपोली या मार्गाकरता ज्यादा फेऱ्या होणार आहेत.
राज्य सरकारने महिलांकरीता एसटीच्या प्रवासासाठी अर्ध्या तिकीटाची सवलत दिल्यामुळे दररोजच्या प्रवासामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेण एसटी स्थानकात प्रवासासाठी महिलांचीवाढत आहे. यानुसार एसटी विभागाने शुक्रवार (ता. ८)पासून पेण-पनवेल आणि पेण-अलिबाग, पनवेल-अलिबाग या फेऱ्या वाढविल्या आहेत. शनिवारी (ता. ९) येथून पनवेल, अलिबाग, नागोठणे, खोपोली अशा जास्तीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याचा फायदा महिलांसह इतर प्रवासी वर्गांनी घ्यावा. महिलांनी सुरक्षितपणे एसटीमधून प्रवास करत असताना चालक, वाहक यांनाही सहकार्य करावे, असे आवाहन एसटी आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT