मुंबई

भावाच्या भेटीने प्रेमाचे आनंदाअश्रू

CD

खारघर, ता. ९ (बातमीदार) : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी तळोजा कारागृहात मोठ्या प्रमाणात बहिणींनी गर्दी केली होती, मात्र कारागृह नियमानुसार भावाला काचेआडच संपर्क साधून रक्षाबंधन साजरा करावा लागला, पण सणानिमित्त भावाशी संवाद साधल्याच्या समाधानाने कारागृहातून बाहेर पडणाऱ्या बहिणींच्या डोळ्यांत प्रेमाचे अश्रू तरळत होते.
बहीण-भावाचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनासाठी सकाळी ७ वाजल्यापासून तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर महिलांनी गर्दी केली होती. या महिलांना टोकन क्रमांक देऊन साधारण आठच्या सुमारास कारागृहात सोडण्यात आले. या वेळी काचेपलीकडे असलेल्या भावाला खिडकीद्वारे राखी देताना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतीक्षालयात भावाला भेटण्यासाठीची तगमग आणि बाहेर पडताना डोळ्यांतील आनंदाश्रू सर्वकाही सांगत होते.
-----------------------------------
प्रत्यक्ष भेट नसल्याची खंत
मुंबईवरून आलेल्या गौरी तुपारे यांचा भाऊ महिनाभरापासून कारागृहात आहे. काचेआड असलेल्या भावाला दूरध्वनीवर संपर्क साधावा लागला. तोंड गोड करण्यासाठी पेढे आणले होते, मात्र मनाईमुळे माघारी घेऊन जावे लागत असल्याचे सांगितले. तर ठाणे विठावा येथील रिची माटे यांनी भावाला राखी देता आली, मात्र प्रत्यक्ष भेट झाली नसल्याचे दुःख असल्याचे सांगितले.
-------------------------------------
कथा, कादंबऱ्या पुस्तकांची भेट
जीवन विद्या मिशन आणि पनवेल इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी कारागृहात कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनदिन साजरा केला. या वेळी जीवन विद्या मिशनकडून विश्व प्रार्थना करताना कारागृहातून बाहेर पडल्यावर समाज घडवण्याचे काम करा, असा सल्ला दिला, तर इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कारागृहातील कैद्यांना दीडशेहून अधिक कथा, कादंबऱ्या पुस्तकांची भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali Net Worth : स्वत:चं कोटींचं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन् बरंच काही...प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

लग्नासाठी दोनदा अल्पवयीन मुलीची विक्री, गरीब मुलींना अडकवत होते जाळ्यात; तिच्या सोबत जे घडलं ते होतं भयानक!

Operation Sindoor : लष्करप्रमुखांनी पहिल्यांदाच 'ऑपरेशन सिंदूर'ची उलगडली थरारक कहाणी; म्हणाले, त्यावेळी बुद्धिबळ खेळण्यासारखी...

New Planet : सौरमालेत सापडला नवा राक्षसी ग्रह; जेम्स वेब टेलिस्कोपने आश्चर्यकारक फोटो केले शेअर, तुम्हीही पाहा

Raju Shetti Criticizes PETA : रामायणापासून ते शिवरायांपर्यंत...! राजू शेट्टींनी केले 'पेटा'वर आघात, काय आहेत गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT