प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण
खारघर, ता. ११ (बातमीदार) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी लोटस सोशल वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. ४) पनवेल येथील आमदार निवासस्थानी पार पडला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे विलास निकम, रतन भोईर, अक्षय लोखंडे, दत्तात्रय ठाकूर, अभिषेक इंगळे, सनी नवघरे, भूषण थोरात, सचिन चिखलकर, राहुल शिंदे, निमिष जोशी, अंकुर शर्मा, किरण रावडे, अजय जाधव, श्रीकृष्ण जगताप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गरीब आणि गरजू कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय वाहतूक उपलब्ध व्हावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून लोटस सोशल वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कीर्ती नवघरे, सचिव ॲड. नरेश ठाकूर आणि खजिनदार ॲड. अमर उपाध्याय यांनी रुग्णवाहिका सुरू केली आहे. ठाकूर यांनी जनतेचे हित लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपक्रम सुरू केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष कीर्ती नवघरे म्हणाले, खारघरमधून नवी मुंबई अथवा पनवेल येथे रुग्णवाहिकेसाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. सर्वसामान्यांना हे परवडत नाही. गरीब, गरजू कुटुंबांना मोफत वैद्यकीय वाहतूक सुविधा देण्यासाठी हा उपक्रम सुरू असून, खारघरवासीयांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे, असे आवाहन केले आहे.
-९९९९९९९९९९९९९९९९९९९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.