मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

CD

सानपाडा मिलेनियम टॉवर पदपथावर कचऱ्याचा बोजवारा
जुईनगर, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका एकीकडे स्वच्छता सर्वेक्षणात उत्तम कामगिरी करत ‘स्वच्छ शहर’ ही बिरुदावली मिळवत असताना, सानपाडा पूर्वेतील मिलेनियम टॉवर परिसरात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. उचभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या या भागातील पदपथावर दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून, त्यामुळे पादचारी त्रस्त झाले आहेत.
मिलेनियम टॉवरसमोरील हा पदपथ एमटीएनएल कार्यालय, रेयान इंटरनॅशनल स्कूल, वेस्टर्न महाविद्यालय तसेच जुईनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन वापराचा आहे. मात्र सतत कचऱ्याचा ढिग असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्यास भाग पडते, जे धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा कचरा काही उपद्रवी घटक किंवा सोसायटीतील सफाई कामगारांकडून टाकला जातो. पालिका हा कचरा नियमित उचलत असली तरी तो पुन्हा टाकला जातो, यामुळे समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. रहिवाशांनी या ठिकाणी कडक कारवाईसह सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. कचरा टाकणाऱ्यांना आम्ही वारंवार सूचना केल्या आहोत. प्रत्यक्ष पालिकेकडून कारवाई करणे गरजेचे असल्याचे मिलेनियममधील रहिवासी चंद्रकांत सरनोबत यांनी सांगितले.
..................
दिघा पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात
वाशी (बातमीदार) ः ठाणे- बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्गच उरलेला नाही. भंगार माफिया, लाकडी वखार, मटण विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी पदपथ आणि रस्त्याचा काही भाग व्यापून दुकाने व गाळे उभारले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, हे अतिक्रमण स्थानिक राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळेच टिकून आहे. ठाणे- बेलापूर महामार्गावरील संजय गांधी नगर परिसरात एका भंगार माफियाने रस्त्यालगत हॉटेल आणि राजकीय जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. यामुळे संध्याकाळच्या वेळी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या रांगा लागतात, परिणामी वाहतूक कोंडी होते. पदपथ अडवले गेल्याने महिलांनाही त्रास सहन करावा लागतो.
........
सीताराम उद्यान ‘फुकट्या’ जाहिरातीमुळे विद्रुप
जुईनगर (बातमीदार) ः सानपाडा सेक्टर ७ मधील सीताराम मास्तर उद्यान परिसरातील कुंपण व प्रवेशद्वारांवर परवानगीशिवाय जाहिरातींचा पाऊस पडत आहे. अगरबत्ती, टूर्स अँड ट्रॅव्हल, राखी, गणपती विक्रेत्यांचे बॅनर आणि फ्लेक्स लावून उद्यानाचे सौंदर्य बिघडवले जात आहे. शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार, विनापरवानगी फलक लावणे गुन्हा आहे. परंतु, परवाना विभागाची परवानगी न घेता व्यावसायिक बिनधास्त जाहिरातबाजी करतात. जुईनगर रेल्वे स्थानक, चौक परिसर आणि झाडांवरही असेच बॅनर दिसतात. पालिका अतिक्रमण विभागाला असे फलक काढून टाकण्याचे व दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेत. नियमांनुसार, प्रथम नोटीस देऊन नंतरच गुन्हा दाखल करता येतो. नागरिकांच्या मते, कारवाईत झालेला विलंब जाहिरातदारांना प्रोत्साहन देतो. उद्यानात परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक फिरायला येतात. खेळण्याची साधने, हिरवळ आणि शांत वातावरणामुळे हे उद्यान लोकप्रिय आहे. परंतु बॅनरमुळे वातावरणाची शोभा कमी झाली आहे. उद्यानाचा चेहरा पुन्हा आकर्षक व्हावा, यासाठी तत्काळ कारवाई आवश्यक आहे, असे नितीन मनसुख या स्थानिक रहिवाशाने सांगितले.
.............
बंजारा समाजाचा नऊ दिवसांचा तिज उत्सव
खारघर (बातमीदार) ः बंजारा समाजाचा पारंपरिक तिज उत्सव यंदा ९ ते १६ ऑगस्टदरम्यान नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी येथे स्थायिक झालेला बंजारा समाज दरवर्षी एकत्र येऊन हा सांस्कृतिक सोहळा साजरा करतो. श्रावण महिन्यात तरुणी रानातून वारुळाची माती आणून टोपलीत ठेवतात, त्यात गहू टाकून जवाराची स्थापना करतात. नऊ दिवस पारंपरिक लोकगीतांसह सकाळ-संध्याकाळ या जवारीला पाणी घालण्याचा विधी केला जातो. अखेरच्या दिवशी तिज विसर्जन होते. महिलांच्या या सांस्कृतिक सहभागात संत सेवालाल महाराज, देवी सामकी माता, आई जगदंबा यांच्या नावाने गीत-नृत्याचे कार्यक्रम होतात. सीबीडी, बेलापूर, खारघर, तळोजा आणि पावणे गावातील विविध बंजारा समाज संस्था या महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. कामोठे रहिवासी दिनकर राठोड यांनी सांगितले की, तिज उत्सव हा समाजाच्या एकतेचा प्रतीक असून, परंपरा जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
...........
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू
उरण (वार्ताहर) ः चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि जे. एम. बक्षी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट रोजी मुंबई विधान भवन येथे लोकार्पण सोहळा होईल. ही बस सेवा कलोते, मोकाशी, ठाकूरवाडी, कलोते खोंडा ठाकूरवाडी आणि कलोते रयती ठाकूरवाडी या मार्गांवर असणार आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्या लांब पायपीटीतून दिलासा मिळेल आणि ते सुरक्षित, वेळेवर शाळेत पोहोचतील. कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत. स्थानिक पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले आहे.
...............
जेएनपीए शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
उरण (वार्ताहर) ः जेएनपीए (शेवा) अंतर्गत रुस्तुमजी केजरीवाला फाउंडेशन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहा वर्षांपासून सातवा वेतन आयोग लागू न करणे, वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता न देणे, भविष्यनिर्वाह निधी जमा न करणे यांसारख्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आमरण उपोषणावर बसले आहेत. ११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला पालक, स्थानिक सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला लवकरात लवकर चर्चेला येऊन मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT