शरद कळसकरचे शिक्षेला आव्हान
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : जामिनाची केली मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषसिद्ध आरोपी शरद कळसकरला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे नसल्याचे सांगून जामीन देण्याची मागणी केली आहे.
हत्येप्रकरणी पुण्यातील कनिष्ठ न्यायालयाने मे २०२४मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात कळसकर याने अपील दाखल केले आहे. नुकतीच न्या. सुमन श्याम आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान अपिलाची दखल घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी २१ ऑगस्टला ठेवली आहे.
कळसकरचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याचा युक्तिवाद कळसकर यांच्या वतीने वकील नितीन प्रधान यांनी केला. त्यांनी तपास आणि खटल्याच्या अनेक पैलूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुन्ह्यात वापरलेले कथित पिस्तूल ऑगस्ट २०१३मध्ये विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून जप्त केले होते; परंतु शस्त्र किंवा दोघांचाही आरोपपत्रात उल्लेख नसून किंवा खटल्यादरम्यान तपासणी करण्यात आलेली नाही. पिस्तूल न्यायवैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या शरीरातून काढलेल्या गोळ्या आणि पिस्तूलमध्ये कोणताही संबंध असल्याचे पुरावेही सरकारी वकील सादर करू शकले नसल्याचा दावाही प्रधान यांनी केला.
....
काय आहेत आक्षेप?
गुन्हा नोंदवणाऱ्या आणि तपास करणाऱ्या प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची सरकारी वकिलांनी चौकशी केली नाही आणि त्यामुळे खटल्यादरम्यान त्यांची उलट तपासणी करता आली नाही. याप्रकरणी काही सहआरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे, तर हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र खटल्यादरम्यान कधीही औपचारिक पुरावा म्हणून सादर केले नाही. त्यामुळे कळसकरही जामीन मिळण्यास पात्र असल्याचा दावा वकील नितीन प्रधान यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.