मुंबई

मॅरेथॉन पूर्ण करणारे बेनी यांचे निधन

CD

मॅरेथॉन पूर्ण करणारे बेनी यांचे निधन

ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी आयोजित केलेली वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर अंतर स्पर्धेत पत्नीसोबत सहभागी होऊन ती यशस्वी पार केल्यानंतर घरी गेलेले बेनी देवासी (वय ४५) यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.
बेनी यांनी दोन महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन ही अतिशय खडतर मॅरेथॉन पार केली होती. त्यानंतरची वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही बेनी यांची शेवटची मॅरेथॉन ठरली. ठाण्यातील वसंत विहार भागात राहणारे बेनी हे परदेशात नोकरीला होते. ते देशविदेशातील विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच धावपटूंकडून कौतुकाचा वर्षाव केला जात होता. ठाण्यातील मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून घरी गेल्यावर बेनी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मंडळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on ECI : ‘’अभी पिक्चर बाकी है’’ ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगास इशारा!

लालबागमध्ये घर घेण्यासाठी विवेक सांगळेला 'या' अभिनेत्रीने केली मोठी मदत; अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Gokulashtami Celebration Places: या वीकेंडला गोकुळाष्टमीचा उत्सव अनुभवायचा? मग भारतातील 'ही' ठिकाणं नक्की भेट द्या!

Raju Patil: मांसाहारी हॉटेल्स, केएसी सारखी उपहारगृह बंद ठेवणार का? मनसे नेत्यांचा KDMCला सवाल

Crime News : ट्रेनिंगमध्ये ओळख, लग्नानंतरही शरीरसंबंध अन् संपवलं आयुष्य...विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पोलीस निरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल...

SCROLL FOR NEXT