कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणूतील हळदपाडा येथे किरकोळ वादातून एका कामगाराची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू खरेदीसाठी पैसे मागितल्यावरून झालेल्या वादातच मित्राने आपल्या मित्राचा जीव घेतला. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी फरार आहे.
हळदपाडा येथील एका झोपडीत पुरन फौजा, सोहम थापा, नितीन गडग आणि काकड्या हे चार मित्र दारू पिण्यासाठी बसले होते. त्या वेळी सोहमने पुरनकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वाद चिघळताच रागाच्या भरात सोहमने झोपडीत असलेला चाकू उचलला आणि फौजाच्या उजव्या हाताच्या बगलेत, तसेच मनगटावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत फौजाला रुग्णालयामध्ये नेण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने वलसाड सिव्हिल हॉस्पिटल व नंतर सुरत सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान १० ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृताचे नातेवाईक बिरेन नरप्रसाद लोकसोम यांनी कासा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी सोहम थापाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.