मुंबई

‘नक्षा’तून मिळकतींचा डिजिटल ठसा

CD

शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ ता. १३ : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाच्या मार्गदर्शनाखाली देशातील १५० शहरी भागांमध्ये ‘नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्व्हे’ (नक्षा) कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. यात महाराष्ट्रातील १० स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून, ठाणे जिल्ह्यातील कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेची निवड झाली आहे.

या प्रकल्पाचा उद्देश जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) तंत्रज्ञानाद्वारे विस्तारित नागरी भागांचे अचूक सर्वेक्षण करून नोंदी तयार करणे आहे. यात प्रत्येक मिळकतीचे क्षेत्रफळ, सीमारेषा, वापर प्रकार (निवासी, व्यावसायिक, औद्योगिक) व मालकी हक्काची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर कुळगाव-बदलापूर येथे पथदर्शी स्वरूपात राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे करआकारणी, प्रॉपर्टी कार्ड वितरण, विकास आराखडा तयारी व मालमत्ता वाद निकाली काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
महसूल विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वेक्षण पथक त्यांच्या परिसरात आले की आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून द्यावी. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराचा एकसंध डिजिटल नकाशा तयार होईल, जो नागरिकांसाठी अनेक वर्षे उपयुक्त ठरणार आहे.

जिल्हास्तरीय समिती गठीत
प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. यात पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ठाणे सहायक संचालक, नगर रचना विभाग, उपअधीक्षक भूमि अभिलेख, अंबरनाथ मुख्याधिकारी, नगरपरिषद कुळगाव-बदलापूर, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य आहेत. अंबरनाथ तालुक्यातील १२ गावे या प्रकल्पात येतात. ज्यात कुळगाव, बदलापूर, कात्रप, शिरगाव, मांजर्ली, जोवेली, खरवई, माणकिवली, बेलवली, एरंजाड, सोनिवली, वालिवली यांचा समावेश आहे.

बैठकीत निर्णय
अलीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, अंबरनाथ उपअधीक्षक सुवर्णा पाटील, मुख्याधिकारी मारुती गायकवाड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. १६ जुलैलाअधिसूचना मंजूर करून जीआयएस आधारित नकाशा, मिळकत पत्रिका व सीमा निश्चित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

नागरिकांना होणारे फायदे
* जीआयएस आधारित नकाशे व मिळकत पत्रिका उपलब्ध होणार.
* मिळकतींचा नकाशा तयार होऊन त्यांचे क्षेत्र व अक्षांश रेखांशसह सीमा निश्चित होतील.
* कर्जसुविधा मिळविणे सोपे होईल.
* न्यायालयीन दावे कमी होतील.
* नागरी हक्कांचे संरक्षण होईल.

‘नक्षा’ कार्यक्रमांतर्गत कुळगाव बदलापूर नगरपालिका ह‌द्दीतील जूनमध्ये सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय (ऑर्थो रेक्टिफाईड इमेज) प्राप्त झाली आहे. त्यानुसार स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञाना‌द्वारे नगर भूमापनाचे काम करणार आहे. नागरिकांनी उपअधीक्षक भूमिअभिलेख अंबरनाथ कार्यालयातील कर्मचारी व यूएव्ही सॉफ्ट सोल्युशन कंपनी गरुडा या एजन्सी प्रतिनिधींना सहकार्य करावे
- सुवर्णा पाटील, अंबरनाथ उपअधीक्षक भूमि अभिलेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT