मुंबई

वेलांकन्नी उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ४ विशेष गाड्या

CD

वेलांकन्नी उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून
चार विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : वेलांकन्नी उत्सव-२०२५ निमित्त मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते  वेलांकन्नीदरम्यान चार विशेष रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे भाविकांना प्रवास करणे सोयीस्कर होणार असून, आरक्षणाची सुविधा शनिवार, १६ ऑगस्टपासून उपलब्ध होईल.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पहिली जोडी गाडी क्रमांक ०११६१/६२ एलटीटी-वेलांकन्नी विशेष मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता एलटीटीहून सुटून गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता वेलांकन्नी येथे पोहोचेल. परतीची गाडी (०११६२) गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता वेलांकन्नीहून सुटून शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.२० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
दुसरी जोडी गाडी क्रमांक ०११६३/६४ एलटीटी-वेलांकन्नी विशेष गाडी रविवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता एलटीटीहून सुटून मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता वेलांकन्नी येथे पोहोचतील. परतीची गाडी (०११६४) मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता वेलांकन्नीहून सुटून बुधवार, १० सप्टेंबर रोजी सायकाळी ४.२० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंतकल, गुटी, तडिपात्री, यर्रगुंटला, कडपा, रझामपेट, रेनिगुंटा, कटपाडी आणि नागपट्टीनम

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT