मुंबई

एपीएमसीतील घोटाळ्याप्रकरणी पणन विभाग आक्रमक

CD

एपीएमसीतील घोटाळ्याप्रकरणी पणन विभाग आक्रमक

जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई बाजार समितीच्या धान्य आणि मसाला मार्केटमधील रस्ते काँक्रीटीकरण कामात निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळ्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने बाजार समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असतानाच, राज्याच्या पणन संचालनालयातर्फे शुक्रवार (ता. ८) चौकशीचे पत्र काढण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग यांना पणन संचालक विकास रसाळ यांनी दिले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला आणि धान्य ब्लॉक फेज दोनमधील अंतर्गत सिमेंट-काँक्रीट रस्ते बांधकामाबाबत निविदा प्रक्रियेविषयी पणन कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्या असून न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना नोटीसवजा पत्राद्वारे बाजार समितीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चौकशीकडे संपूर्ण बाजार घटकांचे लक्ष लागून आहे. बाजार समितीला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासकाची गरज असल्याची भावना बाजार घटकांकडून व्यक्त होत आहे. पणन विभागाने चौकशी आदेश दिल्याने नक्कीच समाधान आहे; मात्र या प्रकरणाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञ आणि गुणवत्ताधारक अभियंत्यांद्वारे व पारदर्शक पद्धतीने केली जावी, अशी मागणी याचिकाकर्ता अनिल तिवारी यांनी केली आहे.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT