नागरिकांच्या सहभागातून विकसित रायगड घडविणार
अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करून विकासाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजन, अत्याधुनिक संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाच्या स्रोतात वाढ आणि विकास प्रकल्पांच्या गतीने पूर्णत्वासाठीचा पाठपुरावा या माध्यमातून भविष्यातील विकसित रायगड जिल्हा साकारला जाईल. यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू या, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी (ता. १५) येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलिस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे आदी उपस्थित होते. अदिती तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या एकमेव अजेंड्यावर राज्य शासन काम करीत आहे. राज्याला देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि सर्वसमावेशक व्हिजन निश्चित केले आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्या वतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे.
...
विविध पुरस्कारांचे वितरण
मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अवयवदात्यांना, १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयांना, पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ प्रमाणपत्र विजेत्यांना, सैनिक नायक पदकविजेत्यांना आणि इतर संस्था आणि व्यक्तींना या वेळी गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.