मुंबई

घर न देता १ कोटी ४७ लाखांचा गंडा

CD

घर न देता एक कोटी ४७ लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. १६ ः घर घेण्याच्या आशेने मोठी रक्कम अदा करूनही ताबा न मिळाल्याने अखेर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे. वेगवेगळ्या गृहप्रकल्पांत सहा घरांच्या खरेदीसाठी तब्बल एक कोटी ४७ लाख रुपये देऊनही घराचा ताबा न मिळाल्याप्रकरणी मोनार्च कंपनीवर सीबीडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीवूड्स परिसरात राहणारे व्यावसायिक सियाराम गर्ग यांनी २०११मध्ये घर खरेदीसाठी मोनार्च कंपनीच्या सीबीडी कार्यालयात संपर्क साधला होता. त्या वेळी कंपनीचे गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर व रामनिवास अग्रवाल यांनी विविध प्रकल्पांची माहिती देत सहा घरे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून गर्ग यांनी एक कोटी ४७ लाख रुपये अदा केले. यानंतर इतकी मोठी रक्कम भरूनही अद्याप त्यांना कोणत्याच घराचा ताबा देण्यात आलेला नाही. उलट कंपनीचे सीबीडी कार्यालयदेखील बंद अवस्थेत असल्याने गर्ग यांना फसवणुकीचा संशय आला. अखेर त्यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर आणि रामनिवास अग्रवाल या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीडी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

2026 Rashi Bhavishya : 2026 मध्ये या राशींना मिळणार छप्परफाड पैसा ! तुमचीही रास आहे का यात ?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 नोव्हेंबर 2025

Delicious Creamy soup: हिवाळ्यातील थंड सकाळी बनवा गरमागरम क्रिमी सूप, नाश्ता होईल परफेक्ट!

SCROLL FOR NEXT