मुंबई

गणेशोत्‍सवात निर्विघ्‍न लखलखाट!

CD

गणेशोत्‍सवात निर्विघ्‍न लखलखाट!
पालिका परिसर प्रकाशमय ठेवण्यासाठी विद्युत विभागाकडून तयारी सुरू
खारघर, ता. १७ (बातमीदार) : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे, तर गणेशोत्सवादरम्यान पालिका हद्दीतील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पथदिवे सुरू राहतील, यासाठी विद्युत विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
पनवेल पालिका हद्दीत पनवेलसह खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा आदी सिडको वसाहती, २९ गावांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे परिसरातील गावे, आदिवासी पाडे आणि सिडको वसाहत बहुतांश घरोघरी बाप्पाचे विराजमान होतो, याशिवाय २५० हून अधिक गणेश मंडळांकडून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवादरम्‍यान सर्व रस्‍ते, पदपथ आणि विसर्जन ठिकाणे आदी परिसर प्रकाशमय असावे, यासाठी विद्युत विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील ८,२५५ खांबांवरील ९,६७८ पथदिवे आणि एलडीडी दिवे, तर शहरी भागात १२ हजार २० विद्युत खांबावर असलेल्या १६ हजार ८०३ एलईडी आणि पथदिव्यांची पाहणी केली जात आहे. बंद आणि नादुरुस्त असलेतेल दिवे काढून नव्याने बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पालिका प्रशासनाकडून विद्युत ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत पालिका परिसर प्रकाशमय असावे, यासाठी बंद असलेले एलईडी आणि पथदिवे दुरुस्त करण्यात यावेत, अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आले असून, त्यावर पर्यवेक्षक आणि उपअभियंत्‍यांकडून नियंत्रणाचे काम केले जात आहे. तसेच या कालावधीत नागरिकांकडून येणाऱ्या सूचनेचे पालन केले जाणार आहे.

११२ विसर्जन घाटावर पथदिवे
पनवेल पालिका हद्दीतील सिडको आणि ग्रामीण भागातील लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे घरगुती गणेश उत्सवात वाढ होत असल्यामुळे पालिकेने ये ११२ ठिकाणी गणेश विसर्जन घाटाची स्वच्छत करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. तसेच एलईडी आणि पथदिवे बसविले जातील. दीड, पाच, सात आणि दहा दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने सुनियोजित काम करावे, अशा सूचना पालिकेच्या वतीने काम करणाऱ्या वायरमन आणि मदतनिसांना देण्यात आली आहे.

पालिका हद्दीतील ग्रामीण भागातील तलाव हे गावाला निसर्गाने दिलेली देणगी आहे. गावाचे शहरात रूपांतर झाल्यामुळे गणेशोत्‍सव अधिक व्यापक स्‍वरूपात साजरा होत आहे. त्यामुळे पालिकेने गणेशोत्सवापूर्वी तलाव परिसराची स्वच्छता करावी. बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- संजय घरत, माजी उपसरपंच, खारघर

गणेशोत्‍सवादरम्‍यान पालिका परिसर प्रकाशमय असावा, यासाठी सर्व रस्ते आणि पदपथ तसेच गणेश विसजर्न घाट परिसरातील विद्युत व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे. तशी सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.
- संजय कटेकर,
मुख्य अभियंता, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT