मुंबई

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर महापूर

CD

बोईसर, ता. १७ (बातमीदार) : बोईसर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील विविध रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. बोईसर-पालघर मुख्य रस्त्यावर सरावली येथे पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी, दुचाकी गाडी बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.

रिमझिम पावसानेच तारापूर औद्योगिक वसाहतीचा परिसर शनिवारी (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) तुंबला होता. गटारांची दुरवस्था, खराब रस्ते आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक वसाहतीची हानी झाल्याचे दिसून येत आहे. एमआयडीसीतील जी. आर. कंपनीसह अन्य कारखान्यांमध्ये पाणी शिरले, तर हॉटेल व्यावसायिकांचेही हाल झाले. काही हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. या पाण्यातून मार्गक्रमण करताना ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवत सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बोईसर ते मंत्रालय असा पायी प्रवास करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० ते ६०० रासायनिक कारखाने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी कारखान्यांत पाणी शिरणे आणि नाले तुंबणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्यावर घाला असल्याचा प्रकार आहे. घातक रसायने पाण्यात मिसळून मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT