मुंबई

घणसोली रेल्वे आवारात प्रशस्त वाहनतळ उभारावा

CD

घणसोली रेल्वे स्थानकासमोर प्रशस्त वाहनतळाची मागणी
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : घणसोली परिसरात नागरिकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने बेकायदा उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि वादांची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ यांनी ऐरोली विभाग व सिडको प्रशासनाकडे घणसोली रेल्वे स्थानकासमोर उपलब्ध मोकळ्या भूखंडावर प्रशस्त बहुमजली वाहनतळ उभारण्याची मागणी केली आहे.
घणसोली नोडल व इतर भागात उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतींमुळे नागरिकांची संख्या झपाट्याने वाढते आहे. रेल्वे स्थानकापासून दूर राहणारे नागरिक रोजच्या प्रवासासाठी आपली वाहने स्टेशन परिसरात पार्क करतात. मात्र अधिकृत पार्किंग अपुरे पडत असल्याने नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. यामुळे रिक्षा स्टँड, बसथांबे आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा अडथळा निर्माण होतो. परिणामी बसचालकांना वळसा घ्यावा लागतो, तर अनेकदा अपघाताच्या घटना घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सध्या रेल्वे स्थानकाच्या कोपऱ्यावर सिडकोने भाडेकराराने दिलेला एक छोटा वाहनतळ आहे. परंतु तो वाहनांच्या संख्येच्या मानाने अपुरा पडतो. त्यामुळे उर्वरित मोकळ्या जागेत मोठे पार्किंग उभारण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पश्चिम बंगाल निवडणूक! मध्यरात्री सुप्रीम कोर्टात हालचाली; 'या' IPS अधिकाऱ्याला तातडीने हटवण्याची मागणी

Karad Accident: टाकीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील दुर्दैवी घटना, चेंडू काढण्यासाठी गेला अन् काय घडलं?

मोठा निर्णय! शाळा ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत फाईलचा प्रवास आता ऑनलाइन; शाळा, तुकडी मान्यता, अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरीतील वशिलेबाजी, बनावटगिरी थांबणार

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण! पोलिसांच्या मदतीसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क, वाचा...

मोठी बातमी! शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका

SCROLL FOR NEXT