मुंबई

गणेशोत्सव तयारीला पर्यावरणाचे रंग

CD

कासा, ता. २३ (बातमीदार) : गणेशोत्सव व ईद मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर डहाणू शहरातील दशाश्री माळी सभागृहात नुकतीच समन्वय समिती व गणेश मंडळांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीस प्रशासकीय यंत्रणा, पोलिस विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, नगर परिषद अधिकारी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत गणेशोत्सव व ईद मिलाद काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या. पोलिस बंदोबस्ताबरोबरच सोशल मीडिया सेल समिती स्थापन करण्यात आली असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच डहाणू, वाणगाव, तलासरी, कासा व घोलवड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी गणेशोत्सव व ईद मिलाद हे आमचेच सण असून त्यातून समाजातील एकोप्याचे दर्शन घडते, असे मत व्यक्त केले. यावर भाष्य करताना जिल्हा पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे म्हणाल्या, की उत्सव शांततेत पार पडावा, सोशल मीडियावरील मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्या. निर्माल्य व्यवस्थेची काळजी घ्या आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा, असे आवाहन करण्यात आले.
पार्श्वभूमीवर सजावटीचे कलात्मक साहित्य, पूजेचे सामान व आवश्यक लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांचा खरेदीकडे कल वाढू लागला आहे. उत्सवाला पर्यावरणाचे रंग भरले जात असल्याने यंदाचा उत्सव समाजात आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.
उत्सवाची तयारी करताना सार्वजनिक मंडळ, घरगुती प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. पर्यावरण रंग देण्यासाठी लाकूड, कपडा, माती, नैसर्गिक रंग, इकोफ्रेंडली सजावटीच्या वस्तू पालघर जिल्ह्यातील बाजारपेठेत दिसून येत आहेत. थर्माकॉलऐवजी कापडी मखर, आकर्षक फुलांचे कृत्रिम तोरण, कंठी, पडदे, रोषणाई, विविध रंगीबेरंगी कागद यांसह ग्राहकांच्या मागणीनुसार कृत्रिम सुटी फुलेदेखील विक्रीसाठी आली आहेत.
तसेच नागरिकांनी बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा आदी विषयांवर प्रश्न उपस्थित केले. यावर महावितरणचे अधिकारी गणेश दांडगव्हाळ यांनी अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले. समुद्रकिनारी विसर्जनावेळी सुरक्षिततेची काळजी घेणे, प्लॅस्टिक टाळणे, डीजेचा आवाज नियंत्रणात ठेवणे, राजकीय घोषणा देऊ नये, धातूचे झेंडे लावू नयेत, शक्यतो शाडू मातीच्या मूर्ती वापराव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहतील, असे प्रशासनाने सांगितले.

चौकट
गणेशोत्सव तयारीला पर्यावरणाचे रंग
पर्यावरणाची होणारी हानी, वाढते प्रदूषण होत असताना उत्सवाला धक्का न लावता पालघर जिल्ह्यातील नागरिक, व्यापाऱ्यांकडूनदेखील पर्यावरणपूरक वस्तूंसाठी प्राधान्य दिले जात आहे. बाजारपेठेत खरेदीचा उत्साह निर्माण झाला आहे, त्यामुळे आर्थिक उलाढालीला तेजी मिळणार आहे.

चौकट
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार (ता. २५)पासून बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने अरबी समुद्रकिनारपट्टीवर सोमवार ते गुरुवार (ता. २८)दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस कमाल व किमान तापमानात वाढ दिसून येईल व परत पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने तापमानात घट होईल.

चौकट
उत्सवाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या मागण्या
विक्रमगड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा व श्री गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे संबंधित विभागाने, विक्रमगड नगर पंचायतीने बुजवून रस्ता सुव्यवस्थित करावा, या महत्त्वाच्या मागण्या केल्या.

कोट
गणेशोत्सवासाठी सजावट साहित्य उपलब्ध आहे. यात विविधरंगी तोरण, सुटी फुले, वेलवेट कपडा, मॅट यासह अन्य पर्यावरणपूरक साहित्य हे उपलब्ध आहे. वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी भाव वाढले आहेत.
- गणेश पांडे, विक्रेते

चौकट
रेडिमेड देखाव्यांना मागणी
कृत्रिम साहित्य - दर
तोरण - १५० ते ६००
१० फूट वेलवेट कपडा - १,५००
लटकन तोरण - ३५० रुपये जोडी
सुटी फुले - ४० ते ६० रुपये डझन
बँक ड्रॉप (एक बाय एक) - १२०
घंटी लहरी - १०० जोडी
एक मीटर वेलवेट कपडा - २००
फ्लॉवर मॅट - १००
कापडी मखर रोषणाई - ४,०००
कापडी डिझाइन व रोषणाई मखर - ६,०००
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT