सामाजिक उपक्रमांची प्रेरणादायी वाटचाल
बेलापूरमध्ये रंगला ‘यिन’चा अकरावा वर्धापनदिन सोहळा
नेरूळ, ता. २३ (बातमीदार)ः नैसर्गिक आपत्ती असो किंवा सामाजिक उपक्रम, समाजाच्या मदतीला धावून जाणे, या ‘सकाळ यिन’च्या प्रेरणादायी प्रवासाची अकरा वर्षांपासूनची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याच ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’चा अकरावा वर्धापनदिन बेलापूर येथील ‘सकाळ भवन’ येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ‘यिन’च्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.
मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते अंशुमन विचारे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ‘प्रत्येकाने आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे, हे ध्येय ठरवले पाहिजे. कारण आयुष्यात धैर्य निश्चित नसेल तर आयुष्याचे फास्ट फूड होऊन जाईल. तर आयुष्याचे फास्ट फूड न करता उत्तम सकस अन्न करा आणि तेच म्हणजे आपले आयुष्य आहे,’ असे अंशुमन विचारे यांनी सांगितले.
‘प्रत्येकाने आपले आयुष्य एकदम सोपे करा. प्रत्येकाने उच्च ध्येय, स्वप्न ठेवा; पण त्यासाठी तुमच्या गरजा अगदी मर्यादित ठेवा तर तुम्ही सुखी राहू शकाल. माणसाच्या गरजा अगदी कमी आहेत. आपल्यातले चांगले गुण शोधा, आपण कसे आहोत, याचा विचार करा. प्रथम स्वतःला बदला, समाज आपोआप बदलेल. स्वतःशी प्रामाणिक राहा,’ असे सांगितले. तसेच ‘यिन’ हे माध्यम खूपच चांगले व्यासपीठ आहे. युवकांसाठी काम करणारे हे एकमेव माध्यम असल्याने ‘सकाळ’चे मनापासून आभार. यानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘यिन’च्या २०२५च्या विशेष अंकाच्या मुखपृष्ठाचे उद्घाटन करण्यात आले.
---------------------------------------------
विविध मान्यवरांची हजेरी
वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास शेवाळे (शिवसेना जिल्हाप्रमुख, रायगड/पनवेल), सिद्धेश दावसकर (युवा सेना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे कोर्ट कमिटी सदस्य, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य), डॉ. प्रीती महाजन (प्रिन्सिपल ऑफ एसएमडीएल कॉलेज), प्रतीक्षा माळी (एसएमडीएल कॉलेज असिस्टंट प्रोफेसर, एनएसएस प्रकल्प अधिकारी), प्रीतीश कुरुमकर (प्रोफेसर ऑफ श्री. डी. डी. विसपुते फार्मसी कॉलेज, पनवेल), जयेश भोईर (सकाळ यिन मंत्री), आकाश दूधकर (यिन सदस्य) आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘यिन’ची माजी महिला बालकल्याण, यिन मंत्री अल्फिया चाफेकर यांनी केले.
----------------------------
वास्तविक पाहता ‘सकाळ’ नेहमी विविध उपक्रम राबवत असतो. आजची तरुणाई देशाचे भविष्य आहे. ‘सकाळ यिन’ तरुणाईला घडवणारे व्यासपीठ आहे. अशा व्यासपीठाच्या तरुणाईने स्वतःबरोबर समाजाच्या विकासात हातभार लावावा. या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले यासाठी ‘सकाळ’चे खूप खूप धन्यवाद. तसेच ‘यिन’च्या अकराव्या वर्धापनदिनाला खूप खूप शुभेच्छा.
- रामदास शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख, रायगड-पनवेल
-------------------------------
‘यिन’ माध्यमातून युवकांना प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य, स्वतःची नेटवर्क घडवू शकतात. ‘यिन’च्या माध्यमातून २०१४ साली ‘सकाळ’सोबत ओळख झाली. वर्धापनदिनानिमित्त खूप शुभेच्छा. तरुणांनी सामाजिक क्षेत्रात घडत जावो, ही शुभेच्छा.
- सिद्धेश दावसकर, युवा सेना कोर्ट कमिटी सदस्य
-------------------------------------
‘यिन’चा अकरावा वर्धापनदिन खूप छान साजरा झाला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. ‘सकाळ’ टीमने कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व वाढविण्याकरिता ‘यिन’चे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील.
- डॉ. प्रीती महाजन, मुख्याध्यापिका, एसएमडीएल कॉलेज, कळंबोली
--------------------------------
‘सकाळ यिन’मार्फत तरुणांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील विकासासाठी चालना मिळते. ‘यिन’च्या विविध सामाजिक उपक्रमातून खऱ्या अर्थाने नवसमाजाची निर्मिती होत आहे.
- डॉ. आशीष जैन, मुख्याध्यापक, श्री. डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.