मुंबई

भात पिकावर बगळ्या रोग

CD

भातपिकावर बगळ्या रोग
मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यात उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणी उशिरा केली; मात्र या भातपिकांवर ‘बगळ्या रोगाचा’ प्रचंड प्रादुर्भाव झाला असून, पिके मरत चालली आहेत. परिणामी शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत. मे महिन्यात सुरुवातीला जोरदार पाऊस झाला; मात्र त्यानंतर खंड पडल्यामुळे भातरोपांची लावणी होऊ शकली नाही. जूनमध्ये उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिरा भाताची लागवड केली. रोपांची वाढ अपुरी असल्याने छोटी रोपे लावली. त्यावर आता बगळ्या रोगाने हल्ला चढवला आहे.

वेहेरे वाडी येथील शेतकरी बंदू कातवरा यांनी सांगितले की, सामान्यतः जोरदार पावसाने बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, पण यावर्षी रोग काही केल्या जात नाही. त्यामुळे आमचं भातपीक मोठ्या प्रमाणावर सुकत आहे. आसोळे गावाचे माजी सरपंच शंकर मारुती कोर यांनीही दु:ख व्यक्त करत सांगितले की, माझी सुमारे दोन एकर शेती पूर्णपणे बगळ्या रोगाने ग्रासली आहे. रोपांची वाढ खुंटली असून, ते मरत आहेत. फवारणीसाठी पावसाची उघडीप लागते, पण अधूनमधून सतत पाऊस सुरूच आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे खतही टाकता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. या दुहेरी संकटामुळे भातशेतीची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

SCROLL FOR NEXT