मुंबई

सणांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत पोलिस मित्रांची बैठक

CD

सणांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत पोलिस मित्रांची बैठक
डोंबिवली, ता. २४ : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलिस ठाण्याच्या वतीने ‘पोलिस मित्र’ यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर कोकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन्ही सण शांततेत आणि सुसंवादाच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी शासनाकडून आलेल्या सूचना आणि दक्षता उपाययोजना यांची माहिती पोलिस मित्रांना देण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अशाही सूचना या वेळी देण्यात आल्या. या बैठकीस तरुण-तरुणींसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शांततापूर्ण सणासाठी पोलिस मित्रांचा सहभाग महत्त्वाचा असून, समाजातील सलोखा टिकवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! दोन दिवसांत ३ जणांना संपवलं, रस्त्यापासून घरापर्यंत सर्वत्र रक्ताचे डाग, तिन्ही घटनेमागचं कारण एकच

Vijay Wadettiwar: सरकार जरांगेंसमोर झुकलं! आता जीआर रद्द केल्याशिवाय थांबू नका, विजय वडेट्टीवार कडाडले

Leopard Attack Kolhapur : पन्हाळ्याच्या पायथ्याशी बिथरलेल्या बिबट्याचा धुडगूस, ६ जणांवर हल्ला; वनविभागाला दिला चकवा

मला माझा हिस्सा द्या! सुभेदाराच्या घरात उभी फूट; प्रियाच्या नादाला लागून घरातल्यांशी भांडणार अश्विन, आजच्या भागात काय होणार?

Latest Marathi News Live Update : पवईत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT