आशियाई शूटिंग स्पर्धेत अवनी कोळीची सुयश
उरण, ता. ३० (वार्ताहर) ः तालुक्यातील दिघोडे गावातील सुकन्या अवनी अलंकार कोळी हिने कझाकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावून राष्ट्रीय क्रीडा दिनी आपल्या देशाचे आणि गावाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. अवनीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दिघोडे गावचे माजी सरपंच अविनाश पाटील आणि सरपंच किर्तीनीधी ठाकूर यांनी अवनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
१६ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान कझाकिस्तानमध्ये झालेल्या १६व्या आशियाई शूटिंग रायफल व शॉटगन डबल ट्रॅप जूनियर वूमन स्पर्धेत अवनी अलंकार कोळीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अवनीने वैयक्तिक ब्रॉन्झ मेडल मिळवले तसेच स्मिता सावंत (महाराष्ट्र) आणि कृषिका जोशी (गुजरात) यांच्यासह सांघिक सिल्वर मेडल जिंकले. तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत दुहेरी पदक जिंकण्याच्या कामगिरीमुळे सर्व उपस्थितांमध्ये आनंद आणि आश्चर्य व्यक्त झाले.
अवनीच्या यशाबद्दल सिद्धांत रायफल व पिस्टल शूटिंग क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सेक्रेटरी-प्रशिक्षक किशन खारके, सदस्य महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, तसेच राष्ट्रीय नेमबाज अलंकार कोळी यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. दिघोडे गावातील सरपंच किर्तीनीधी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी अवनी कोळीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.