
मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून जरांगे पाटील आझाद मैदानात हजारो आंदोलकांसह उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आंदोलन पुन्हा का सुरू झालं? जरांगे पाटलांना पुन्हा मुंबईथ का यावं लागलं हे एकनाथ शिंदेंनाच विचारा असं म्हटलं होतं. यावरून राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली होती की मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे हे पडद्यामागून मराठा आंदोलनाला रसद पुरवत आहेत. आता या चर्चांवर आणि राज ठाकरेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय.