डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा निर्माल्यातून खतनिर्मिती उपक्रम
नेरूळ, ता.३१(बातमीदार) ः नवी मुंबईतील गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दीड महिना आधीपासूनच जनजागृतीला सुरूवात करण्यात आलेली असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्यातून खतनिर्मिती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य गोळा केले जात असून त्यांच्या पाकळ्या सुट्या करून त्याचे सेंद्रिय कंपोस्टमध्ये रूपांतर केले जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहा फुटांपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन १४३ इतक्या मोठ्या संख्येने सर्व विभागात बनविलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सर्व २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी हार, फुले असे ओले निर्माल्य आणि सजावटीच्या साहित्यातील कंठी, माळा असे सुके निर्माल्य वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर तुर्भे येथील प्रकल्पस्थळी घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ओल्या निर्माल्याचे खतात रूपांतर केले जाणार आहे.
........................
पर्यावरणहिताय उपक्रमात काही स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत सक्रिय सहभागी झालेल्या आहेत. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर १९ येथील धारण तलाव, महापे तलाव आणि सेक्टर ९ विस्तारित तलाव येथे गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य गोळा केले जात असून त्यांच्या पाकळ्या सुट्या करून त्याचे सेंद्रिय कंपोस्टमध्ये रूपांतर केले जात आहे. दीड दिवसाच्या विसर्जनप्रसंगी या तीन विसर्जन स्थळांवरून ५३४ किलो फुलांचे निर्माल्य संकलित करण्यात आले असून त्यापासून पाकळ्या सुट्या करून त्यापासून निर्माण होणारे खत परिसरातील हिरवाई फुलविण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.