कोपरखैरणेत वाहतुकीचा बोजवारा
खासगी मॉलच्या ग्राहकांकडून रस्त्यावर बेकायदा पार्किंग
कोपरखैरणे, ता. ३१ (बातामीदार) ः कोपरखैरणेमध्ये पार्किंगचा प्रश्न बिकट बनला आहे. येथील एका खासगी मॉलमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच गाड्या बेकायदा पार्क करीत असल्याने परिसरत वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
मागील काही वर्षांपासून नवी मुंबईत गाड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र शहरामध्ये पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने अनेक विभागांत बेकायदा गाड्या पार्क केल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरखैरणेमध्येदेखील वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच येथील एका खासगी मॉलमधील ग्राहकांकडून रस्त्यावरच गाड्या बेकायदा पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक रहिवासी अनिता पाटील म्हणाल्या, की आम्ही रोज संध्याकाळी या भागातून जातो. गाड्या पदपथावर उभ्या असल्याने आम्हाला रस्त्यातून चालावे लागते. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब आहे, असे त्यांनी सांगितले. या समस्येमुळे वाहनचालक आणि पादचारी संताप व्यक्त करीत आहेत. विशेषतः शाळा, अपार्टमेंट्स आणि व्यावसायिक इमारती जवळ असल्याने परिसरातील कोंडी दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांची गर्दी अनेकपट वाढते.
...............
प्रशासनाकडे मागणी
स्थानिक रहिवासी संघटना आणि प्रवासी युनियन यांनी महापालिका आणि वाहतूक विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
स्थानिकांनी ठामपणे मागणी केली आहे, की येथील खासगी मॉलसारख्या मोठ्या स्टोअरच्या समोरील जागेत तातडीने पार्किंगची सोय करावी. तसेच परिसरातील वाहतुकीसाठी मार्गदर्शक व्यवस्था राबवून रस्त्यावर वाहतूक सुस्थितीत करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.