मुंबई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्लॅस्टिकचे विघ्न!

CD

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्लॅस्टिकचे विघ्न!
पनवेल महापालिका हद्दीतील स्थिती; साहित्य, मिठाई, फळांसाठी सर्रास वापर
पनवेल ता. १ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेने ‘उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी सप्तसूत्रीचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला होता, मात्र पालिकेच्या पर्यावरणपूरक उत्सवाला प्लॅस्टिकच्या सर्रास वापराचे विघ्न आले आहे. त्यामुळे या अभियानाला एक प्रकारे अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पनवेल महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारले होते. या ठिकाणी गिरीधर मूर्ती प्रशिक्षण व कला केंद्र, श्री गणेश कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानातून मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती माफक दरात विक्रीस ठेवण्यात आल्या. तसेच विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्ती दान करणाऱ्या व कृत्रिम तलावामध्ये विर्सजन करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून प्रशस्तिपत्रक देण्यात येत होता. त्याचबरोबर मूर्तिकारांना मोफत शाडू मातीचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा, पोस्टर स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम, परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रातील विविध एनजीओंच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेस सहकार्य केले जात आहे.
मूर्ती लाल मातीची किंवा शाडूची असावी, मखर, आरास, सजावट हे कापड, कागद किंवा फुलांचे करावे, डीजे टाळावा, नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने घरीच एका मोठ्या ड्रममध्ये पाण्यात मंगलद्रव्ये घालून त्यामध्ये श्रींचे विसर्जन करावे, निर्माल्य हे निर्माल्य कलशातच कागदी पिशवीतून टाकावे, ही सप्तसूत्री महापालिकेने घोषित केली होती. यासाठी नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसाद मिळालासुद्धा, मात्र ५० मायक्रोनपेक्षा पातळ प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर होत आहे. गणरायासाठी आरास, पूजेचे साहित्य, प्रसाद, हार, फळे, फुले या सर्व गोष्टी प्लॅस्टिकच्या पिशवीतच आणल्या जात आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला एक प्रकारे खीळ बसली आहे.

गणेशोत्सव काळात अधिक वापर
पनवेल परिसरामध्ये प्लॅस्टिकबंदीचा अगोदरच फज्जा उडाला आहे. त्यातच गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर झालेला आहे. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक घंटा गाडीमध्ये येत आहे. दुप्पट, तिप्पट प्लॅस्टिक डम्पिंग ग्राउंडवर जात आहे. त्याचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्लॅस्टिकबंदीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याकडे ठेवत आहेत. ग्राहक या पिशव्यांची मागणी करतात. त्यामुळे साहजिकच प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवाला यामुळे एक प्रकारे छेद बसत आहे. याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
- शितल दिनक, पर्यावरणप्रेमी, कामोठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूस्खलनात अख्खं गाव गाडलं गेलं, किमान १ हजार जणांचा मृत्यू, एकटाच वाचला; वेस्टर्न सुदानमधील घटना

Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ अडचणीचे'; दोन प्रकरणांत सर्वोच्च, उच्च न्यायालयाची नकारघंटा

Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली

Mitchell Starc Retirement: मिचेल स्टार्कने अचानक जाहीर केली निवृत्ती; म्हणाला, कसोटी अन् वन डे क्रिकेट...

Latest Marathi News Updates : कर्नाटकात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT