आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास जोगेश्वरी पश्मिममधील एस. व्ही. रोडवरच्या बेह्रमपाडा येथील जे.एन.एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मुंबई अग्निशमन दलाने (MFB) घटनास्थळी धाव घेतली. ही लेव्हल-II ची आग असल्याचे घोषित केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलासोबत पोलिस, अँब्युलन्स सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएमसी वॉर्ड कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.