मुंबई

अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे तरुणांना आवाहन

CD

अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे तरुणांना आवाहन
जुईनगर, ता. १ (बातमीदार) : नेरूळ परिसर हळूहळू अमली पदार्थ आणि गांजाचा अड्डा बनत असून, यापासून विद्यार्थी आणि युवकांना दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत गणरायाला प्रार्थना करणारा बॅनर नेरूळ परिसरात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या माध्यमातून नशामुक्त नेरूळ अभियानाचा श्रीगणेशा यंदाच्या गौरी-गणपतीपासून सुरू करीत असल्याचाही मजकूर प्रदर्शित करण्यात आला आहे. परिसरात गांज्याची विक्री वाढली असून, त्याचे सेवन करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे असे प्रकार दिसताच नेरूळ पोलिस ठाण्याच्या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेरूळ विभागात गांजाविक्री आणि त्याचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नेरूळ गावातील माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे आणि समाजसेवक देवनाथ म्हात्रे यांनी याबाबत बॅनरमार्फत जनजागृती सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

Pune Elections 2025 : प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या

SCROLL FOR NEXT