मुंबई

साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा धोका

CD

टिटवाळ्यात फवारणीला सुरुवात
‘सकाळ’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल
टिटवाळा, ता. ८ (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसांतील पावसामुळे टिटवाळा शहरातील विविध भागांत पाणी साचून राहत आहे. यामुळे या ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या गंभीर संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने आता या ठिकाणी फवारणीला सुरुवात केली आहे.
टिटवाळ्यातील अनेक भागांत साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वास्तव मांडले होते. यानंतर प्रशासनाने तत्काळ टिटवाळा शहरातील विविध भागांत फवारणी मोहीम सुरू केली आहे. गणेशनगर, मांड पश्चिम, मस्जिद रोड इत्यादी भागांत कीटकनाशक फवारणी करून साचलेले पाणी व नाल्यांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, भविष्यात नियमित स्वच्छता आणि फवारणी करण्याची मागणी केली आहे.

लेप्टोस्पायरोसिस आजारांचा धोका

पावसाचे साचलेले पाणी व नाल्यांमधून वाहणारे घाण पाणी मिसळल्यामुळे दूषित वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उंदरांच्या मूत्रातून पसरणाऱ्या लेप्टोस्पायरोसिसचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, की या आजाराची सुरुवात साध्या ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी या सामान्य वाटणाऱ्या लक्षणांपासून होते. परंतु योग्य वेळी निदान व उपचार न मिळाल्यास आजार गंभीर स्वरूप धारण करून मूत्रपिंड व यकृत निकामी होण्याची शक्यता असते. काही रुग्णांमध्ये मृत्यूसुद्धा ओढवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

लग्न करू नको...२९ लाख रुपये देते, आईची मुलीला अनोखी ऑफर, पण कारण काय?

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Cracked Heels: भेगांमुळे सतत टाच दुखत आहे का? मग हा 2 मिनिटांचा नैसर्गिक उपाय वापरा

SCROLL FOR NEXT