मुंबई

लोकल प्रवासात नवरा-बायको यांचे मोबाईल चोरले

CD

लोकल प्रवासात पती-पत्नीचे मोबाईल चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : मेव्हणीला मुंबई एअरपोर्ट येथे सोडण्यासाठी लोकलने निघालेल्या नवी मुंबईच्या घणसोलीतील घोष या दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. लोकल प्रवासात दोघांचे मोबाईल चोरीला गेले असून त्यांची किंमत ९० हजार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घणसोली येथे राहणारे तक्रारदार अर्जित कुमार घोष (३४) हे त्यांची मेव्हणीला मुंबई एअरपोर्ट येथे सोडण्यासाठी पत्नीसह रविवारी (ता. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास घरून निघाले. घणसोली ते ठाणे असा लोकलने प्रवास करून ते ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक नऊ आणि १० वर उतरले. तेथून ते फलाट क्रमांक चारवर आले. त्या वेळी त्यांनी त्यांच्यासह पत्नीचा मोबाईल खिशात ठेवला होता. पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या लोकलमध्ये ते तिघे चढले. डब्यात पोहोचल्यावर खिशात ठेवलेले मोबाईल पाहिले असता ते मिळून आले नाही. अनोळखी व्यक्तीने गर्दीत चढताना ५० हजार आणि ४० हजार असे ९० हजारांचे दोन मोबाईल चोरून नेले. त्यानंतर मेव्हणीला मुंबई एअरपोर्ट येथे सोडून आल्यावर रात्री उशिरा त्यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (ता. ८) गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT