मुंबई

बीज मोदकातून निसर्ग रक्षणाचा संदेश

CD

बीज मोदकातून निसर्ग रक्षणाचा संदेश
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पर्यावरण प्रेमाचा अनोखा संगम घडवणारा उपक्रम उल्हासनगरातील एसएसटी महाविद्यालयातल्या एकाक्षरा गणेशोत्सवात पाहायला मिळाला. पारंपरिक मोदकाऐवजी बीज मोदक प्रसादाच्या स्वरूपात वाटले गेले. त्यांनीच यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरवले. कागदाच्या पॅकेजिंगमध्ये बंदिस्त, क्यूआर कोडसह सज्ज असलेल्या या तीन हजारपेक्षा अधिक बीज मोदकांमध्ये पालक, तोंडली, पडवळ, टोमॅटो यांसारख्या घरगुती भाज्यांची बीजे सामावली होती. पाहुण्यांपासून शाळा, महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये आणि अगदी पोलिस ठाणे व महापालिकेच्या मुख्यालयातही या मोदकांचे वाटप करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश पोहोचवण्यात आला.

एसएसटी महाविद्यालयात दरवर्षी साजरा होणारा एकाक्षरा गणेशोत्सव यंदा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या बीज मोदक उपक्रमामुळे विशेष ठरला. गणपती बाप्पाच्या प्रसादाऐवजी जवळपास तीन हजार बीज मोदकांचे वाटप केले. या मोदकांमध्ये पालक, टोमॅटो, तोंडली, पडवळ यांसारख्या भाज्यांची बीजे ठेवली असून, नागरिकांनी ती लावून झाडे वाढवावीत, असा संदेश यातून देण्यात आला. विशेष म्हणजे, प्रत्येक मोदक कागदाच्या पॅकेजिंगमध्ये बंदिस्त असून, त्यावर क्यूआर कोड दिलेला आहे. हा कोड स्कॅन केल्यावर संबंधित बीजाचे शास्त्रीय नाव, वैशिष्ट्ये आणि ते झाड कसे लावायचे याची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे प्रसादाचा हा उपक्रम केवळ श्रद्धेचा नव्हे तर निसर्गाशी जोडणारा ठरला आहे.

हा उपक्रम केवळ महाविद्यालयापुरता मर्यादित न ठेवता विविध शाळा, महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये तसेच विठ्ठलवाडी पोलिस ठाणे आणि उल्हासनगर महापालिका मुख्यालयातही राबवण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गालाही बीज मोदकांचे वाटप झाले. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले, तर सहाय्यक आयुक्त अजय साबळे यांनी एनएसएस स्वयंसेवक व ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमामुळे उल्हासनगर शहराला प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनाची जाणीव
राष्ट्रीय सेवा योजनेचे ठाणे जिल्हा समन्वयक व उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन क्लब समन्वयक व एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. नम्रता सिंह, प्रा. स्नेहा गुप्ता व प्रा. मयूर माथुर यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात पुढाकार घ्यायला प्रेरित केले. एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी व समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. ‘बीज मोदक’ या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव तर निर्माण झालीच, पण समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीही दृढ झाली आहे. श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम घडवणारा हा उपक्रम उल्हासनगरच्या गणेशोत्सवात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : राज्य सरकारच्या सेवा आणि योजना व्हॉट्सअपवर येणार - मुख्यमंत्री फडणवीस

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT