मुंबई

पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

CD

पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

कासा, ता. २९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कळमदेवी परिसरातील रायपूर येथील शेतकरी सदानंद देऊ भुरभुरा (वय ५५) यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद भुरभुरा सोमवारी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत होते. त्या वेळी मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला होता. नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय घसरला व ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी (ता. २९) सकाळी कळमदेवी येथील शिलोंडा ग्रामपंचायत हद्दीत नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT