मुंबई

विद्यार्थ्यांनी साकारली "हर्बल गार्डन"ची प्रतिकृती

CD

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘हर्बल गार्डन’ची प्रतिकृती
जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त अनोखा उपक्रम
वाणगाव, ता. ३० (बातमीदार) : औषधनिर्माता हा आरोग्य व्यवस्थेमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. कोविडच्या काळात फार्मासिस्टने मोठी भूमिका बजावली. यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता निर्माण होते, असे प्रतिपादन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत धाराशिवकर यांनी जागतिक औषधनिर्माता दिनाच्या कार्यक्रमात केले.
डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगाव येथील वाय. एन. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक औषधनिर्मातादिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स तयार करून आपले कौशल्य सिद्ध केले, तर मॉडेल मेकिंग स्पर्धेत हर्बल गार्डनची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचा पुढाकार
सायली पाटील, तिशा कानोजिया, रोहन गुप्ता आणि प्रणित दुमाडा या विद्यार्थ्यांनी हर्बल गार्डनची प्रतिकृती तयार केली आहे. यासाठी प्राचार्य डॉ. संकेत धाराशिवकर, विभाग प्रमुख प्रा. शैलेश कोकणी, प्रा. स्नेविका धोडी, प्रा. प्रियांका वाडीले, प्रा. अंजली सिंग आणि प्रा. यश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, कार्यकारी संचालक तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.

हर्बल गार्डनची प्रतिकृती
हर्बल गार्डनच्या प्रतिकृतीमध्ये तुळशी, कडुनिंब, कोरफड, पुदिना, अशोक, विन्का, जास्वंद, अपराजिता, पान आणि कोथिंबीर अशा १० महत्त्वाच्या औषधी वनस्पती दाखवल्या असून, त्या हर्ब, श्रब, ट्री, क्लायंबर आणि फ्लॉवर या वर्गवारीनुसार विभागल्या आहेत. याशिवाय ड्रायिंग शेड, बाके, पायवाटा आणि मध्यभागी विहीर या गोष्टींमुळे मॉडेल अधिक वास्तवदर्शी बनविण्यात आले आहे.

मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रतिकृती प्रदर्शित केल्या, त्यात हर्बल गार्डनची प्रतिकृती विशेषतः लक्ष वेधून घेत होती. हर्बल गार्डन म्हणजेच औषधी वनस्पतींची बाग. ही आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक फायद्यांसाठी महत्त्वाची असते. उद्यानांमुळे औषधी वनस्पतींचे संरक्षण होते.
- डॉ. संकेत धाराशिवकर, प्राचार्य, फार्मसी महाविद्यालय, आसनगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

IND vs AUS: हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार की नाही?

Google आता तुमच्या मोबाईलवर ठेवणार नजर! Chrome अन् Gemini मध्ये मोठा बदल, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बदला 'ही' एक सेटिंग

Jalgaon News : जळगावमध्ये माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक; ऑनलाइन विदेशी नागरिकांची लूट

SCROLL FOR NEXT