मुंबई

तरुणाईला प्रेरणा देणारी ७० वर्षांची सायकलपट्टू

CD

तरुणाईला प्रेरणा देणारी ७० वर्षांची सायकलपटू
अरुणा लागू यांची ८२,९९६ किलोमीटर सायकल राईड पूर्ण
वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : सामान्यतः वयाच्या सत्तरीच्या आसपास लोकांना कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारख्या त्रासांनी हालचालही कठीण होते; मात्र ठाण्यातील ७० वर्षीय अरुणा लागू यांनी वृद्धत्वाला हरवत तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. अरुणा लागू यांनी वयाच्या ६० व्या वर्षी सायकलिंगला सुरुवात केली आणि आतापर्यंत तब्बल ८२,९९६ किलोमीटर सायकल राईड पूर्ण केली आहे. मागील ३० वर्षांपासून त्या नियमितपणे ट्रेकिंग करत असून, त्यांच्यावर अनेक ट्रॉफी, सन्मानपत्रे आणि पदकांनी सन्मान करण्यात आला आहे.

अरुणा लागू यांचा प्रवास केवळ सायकलिंगपुरता मर्यादित नाही. त्या हिमालयातील कठीण ट्रेक्समध्येही सहभागी होतात. गेल्या ३० वर्षांत त्यांनी ६५० पेक्षा अधिक ट्रेक्स पूर्ण केले असून, ३०० हून अधिक गडकिल्ल्यांना भेट दिली आहे. यामध्ये कैलास, मान सरोवर परिक्रमा, एव्हरेस्ट बेस कॅम्प, अमरनाथ यात्रा, गोमुख-तपोवन आणि पंचकेदार यांसारखे अत्यंत आव्हानात्मक ट्रेक्सही समाविष्ट आहेत.

त्याशिवाय, अरुणा लागू या वायएचएआयच्या (युथ होस्टेल्स असोशिएशन आॅफ इंडिया) आजीवन सदस्य असून, त्यांनी कॅम्प लीडर म्हणूनही काम केले आहे. त्यांना रोईंग आणि कॅनॉईंग या जलक्रीडा प्रकारांतही प्रावीण्य आहे. सायकलिंगच्या बाबतीतही त्यांचा विक्रम अप्रतिम आहे. त्यांनी ५० वेळा १०० किलोमीटर आणि ६०५ वेळा ५० किलोमीटरचे राईड्स पूर्ण केले असून, १२१५ वेळा येऊर लूप्स केल्या आहेत. त्यापैकी २३ येऊर लूप्स एका दिवसांत पूर्ण करणे त्यांचा विक्रम आहे. कोकणात त्यांनी अनेक सोलो राईड्स केल्या असून मुंबई-गोवा, कन्याकुमारी-चेन्नई, मनाली-लेह, हम्पी-बदामी अशा अनेक खडतर मार्गांवर सायकलिंग केले आहे.

हिमालयातील सेलापास राईडदरम्यान त्यांनी एका दिवसात अर्धा एव्हरेस्टपेक्षा अधिक उंची पार केली आहे. त्यांच्या नावावर १२ ट्रॉफी, ४ सन्मानपत्रे आणि असंख्य पदके आहेत. आजही त्या आव्हानात्मक घाटांवर स्वावलंबी राईड्स करत आहेत. अरुणा लागू यांचे मत आहे, “वय किती आहे यापेक्षा मन किती तरुण आहे हे महत्त्वाचे. जिद्द, चिकाटी आणि ध्यास असेल, तर कोणतंही शिखर अजेय राहत नाही. शरीर थकतं पण मन तयार असेल, तर ७० व्या वर्षीदेखील हिमालय चढता येतो” अशा जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या प्रतीक असलेल्या अरुणा लागू यांनी तरुण पिढीला निश्चितच नवी दिशा दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT