मुंबई

समुद्र किनाऱ्याला ‘शक्ती’चा धोका

CD

वाणगाव, ता. ४ (बातमीदार) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे ८ ऑक्टोबरपर्यंत पालघरच्या समुद्रकिनाऱ्याजवळील भागात वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे, तसेच ७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरला पावसाचा जोर वाढेल आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या ईशान्यकडे ६ ऑक्टोबरच्या सकाळपासून वादळ सरकणार आणि हळूहळू कमकुवत होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहे, अशी माहिती कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टी भागात लाटा उंचावण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनीदेखील किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विभागाचा सल्ला
किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने शेतकरीबांधवांनी नवीन लागवड केलेली झाडे तुटून, कोलमडून पडू नयेत, म्हणून काठीने आधार द्यावा. काढणीस तयार झालेल्या उन्हाळी भाताची कापणी शक्यतो १० ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज बघून करावी. काढणीस आलेला भाजीपाला, फळे व फुलांची काढणी करून बाजारात पाठवावे, असा सल्ला कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT