मुंबई

कंत्राटदाराची बेपर्वाई उघड

CD

कंत्राटदाराची बेपर्वाई उघड
श्रीवर्धन, ता.४ (वार्ताहर)ः श्रीवर्धन येथील जुने तहसील कार्यालय पाडून त्या जागेवर भव्य शिवस्मारक उभारणीचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग कायम रहदारीचा असल्याने नगरपरिषदेने येथे ‘नो पार्किंग’ फलक लावले होते. मात्र संरक्षण भिंतीलगत असलेला एक फलक कंत्राटदाराने काढून अडगळीत टाकल्याचे निदर्शनास आले आहे. भगवान महावीर मार्गावरील जुने तहसील कार्यालय प्रशासकीय भवनात हलवल्यानंतर इमारत वर्षानुवर्षे जीर्ण अवस्थेत पडून होती. अखेर खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून या जागेवर शिवस्मारक व सुशोभीकरणाचे नियोजन करण्यात आले. साधारण दीड वर्षांपूर्वी मोडकळीस आलेली इमारत पाडून सपाटीकरण करून कामास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, बांधकामाच्या कामावेळी तहसील कार्यालयालगतची संरक्षण भिंत पाडण्यात आली. त्यावेळी येथील ‘नो पार्किंग’ फलकही कंत्राटदाराने काढला. बांधकामाच्या भोवती पत्रे लावून त्या आधाराने फलक तात्पुरता ठेवला असला, तरी मूळ स्थितीत तो आजतागायत बसवण्यात आलेला नाही.या वेळी तहसील कार्यालया लगत असलेली संरक्षण भिंत कामा दरम्यान पाडण्यात आली. कामास सुरुवात होऊन इतका कालावधी गेला परंतु कंत्राटदाराने फलक योग्य स्थितीत उभा केला नाही.या संदर्भात नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता, “या फलकाबाबत माहिती नाही; जागेवर जाऊन पाहतो,” अशी प्रतिक्रिया मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT