मुंबई

ध्येय निश्चिती करून भविष्याची वाटचाल करा

CD

ध्येयनिश्चिती करून भविष्याची वाटचाल करा
शेअरबाजार तज्ज्ञ ॲड. वृषाली देसाई यांचे मार्गदर्शन
पेण, ता. ४ बातमीदार : शिक्षण हे फक्त पदवी घेण्यापुरते मर्यादित नसून, त्याचा खरा उपयोग करण्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे शेअर बाजार तज्ज्ञ ॲड. वृषाली देसाई यांनी सांगितले. ध्येय ठरवा आणि त्यासाठी वेडे व्हा; भविष्यातील वाटचाल मंगलमय व सुखकर होईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
सकाळ एनआयईच्या वतीने आयोजित ‘वाटचाल भविष्याची’ या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे, पेण येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तरुण पिढीला योग्य दिशा देणे आणि आत्मविश्वास वाढविणे होते. या वेळी ॲड. हर्षल मोरे, साक्षी दळवी, माध्यमिक शिक्षक आर. एम. माळवदे, के. सी. शिर्के, प्राथमिक शिक्षक विजय पाटील यांसह शाळेचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. ॲड. वृषाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, की फक्त पदवीधर होणे हे उद्दिष्ट नसून, पदवी घेतल्यानंतर ती आपल्याला कशी उपयोगी पडेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेण्यापूर्वी स्वतःला विचार करावा की त्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे आणि त्यासाठी योग्य मार्ग निवडावा. शेअर मार्केट हा व्यावसायिक शिक्षणासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
...........
कार्यक्रमात ॲड. हर्षल मोरे यांनी सांगितले, की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आयुष्य चांगले किंवा वाईट बनवणे हे आपल्या हातात आहे. शाळा, गुरुजी, आई-वडील आणि सामाजिक संस्था मार्ग दाखवतात; परंतु शेवटी वाट कोणती चालायची हे स्वतः ठरवावे लागते. तर माध्यमिक शिक्षक आर. एम. माळवदे यांनीही जोडून म्हटले, की आज अनेक तरुण ऑनलाइन व्यवसाय आणि शेअर बाजारात कार्यरत आहेत. तरुणांमध्ये क्षमता आहे; फक्त चिकाटी, जिज्ञासा आणि मेहनत आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT