उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : रात्रीचा अंधार, शांत रस्ते आणि अचानक सुरू झालेली पोलिसांची धडक मोहीम अशा फिल्मी स्टाइल वातावरणात उल्हासनगरात शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर धडक देत ऑपरेशन ऑल आउट राबवले. झोन-४चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन चालले.
गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध दारूविक्री, जुगार, अमली पदार्थ सेवन, तंबाखूविक्री आणि अन्य गुन्ह्यांवर लगाम आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. शहराच्या सर्व विभागांत विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त छापेमारी मोहिमेत उतरले होते. नागरिकांना रात्री उशिरा पोलिस पथकांचे ताफे गस्त घालताना, लॉज-बार, जुगार अड्डे आणि संशयित ठिकाणी तपासणी करताना दिसले. या ऑपरेशनमध्ये ३६ अधिकारी आणि १६६ अंमलदार सहभागी झाले. शहरातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा मध्यरात्रीपर्यंत सज्ज होती. अड्ड्यांवर आणि संशयित ठिकाणी छापे मारत गुन्हेगारीला आळा घालण्यात आला. या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे.
उल्हासनगरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जातील. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून सहकार्य करावे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
कारवाईचा तपशील
* मद्यनिषेध : चार प्रकरणे / चार नोटिसा
* जुगार : एक प्रकरण / सहा नोटिसा
* अमली पदार्थ सेवन : तीन प्रकरणे / तीन नोटिसा
* तंबाखू : सहा प्रकरणे / सहा नोटिसा
* एमप कायदा कलम १४२ : दोन प्रकरणे (एक अटक / एक नोटीस)
* लॉज व बार तपासणी : ८३ ठिकाणी तपासणी
* नाकाबंदी : आठ ठिकाणी (एकूण १६२ वाहनांची तपासणी) ५१,५०० दंड वसूल
* एकूण अटक : एक
* एकूण नोटिसा : २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.