राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पूरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र
तारापुर, ता. ६ (बातमीदार)ः महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या थैमानानंतर उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थिती व पुरात उध्वस्त झालेली शेतातील उभी पिक आणि शेकडो घरे आणि मृत पावलेली गुर ,ढोर या महासंकटाप्रसंगी पूरग्रस्तांना आधार मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बोईसर येथे सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्रात बोईसरकर सढळ हस्ते अन्नधान्य औषधे व कपडे आणि मुख्यमंत्री सहायता निधी या नावे मदतीचा धनादेश देऊन मदत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस संतोष मराठे यांच्या नेतृत्वाखाली बोईसरला पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू व आर्थिक मदतिचा धनादेश स्वीकारण्याकरिता संकलन केंद्र सुरू करण्यात आले असून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी सदर केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांचे दुःख हे फक्त त्यांचे वैयक्तिक नाही, तर आपल्या सर्व महाराष्ट्राचे आहे. या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी बजावणे हीच खरी देशसेवा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकदिलाने या संकटग्रस्त बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , अजित संखे, धनेश क्षीरसागर, मिलिंद मराठे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.