मुंबई

वागळे औद्योगिक वसाहताची कोंडी

CD

वागळे औद्योगिक वसाहताची कोंडी
अतिक्रमणासह बेकायदेशीर पार्किंगचे सापळे; उद्योगधंद्यांवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : उद्योगवाढीसाठी ठाणे जिल्ह्यातील उद्योजक अडथळ्यांची शर्यत पार करत असताना ठाणे शहरातील वागळे औद्योगिक वसाहतीचीही चारही बाजूने कोंडी होत आहे. वाढत्या आयटी पार्कमुळे वाढलेले बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल, अतिक्रमण, दुतर्फा अनधिकृत पार्विंâग आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथील कारखानदार, उद्योजक हैराण झाले आहेत. याचा परिणाम मालाच्या आवक-जावकवर होत असून, ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येथील उद्योगांसमोर स्थलांतरणाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा स्मॉल स्केल इंडस्ट्रीने दिला आहे.

ठाण्याची ओळख पूर्वी औद्योगिक जिल्हा म्हणून होती. त्यात ठाणे शहरातील वागळे औद्योगिक वसाहत ही सर्वात मोठी मानली जात होती. आता या औद्योगिक वसाहतीमधील निम्म्याहून अधिक कारखाने बंद किंवा स्थलांतरित झाले आहेत. त्या जागेवर ९० हून अधिक आयटी पार्क उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत येथील उवैरित उद्योग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत, पण त्यातही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोंडी आणि अतिक्रमणची समस्या गंभीर आहे. यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट आणि ठाणे पालिका अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. या वेळी उपस्थित स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजेच टीसाचे अध्यक्ष भावेश मारु यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला.

वागळे इस्टेट परिसरात दिवसेंदिवस वाहनांचा ताण वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्षे टाकलेल्या भंगार गाड्यांची संख्या वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग आणि आयटी पार्क परिसरातील अनियंत्रित वाहनतळामुळे रस्ते कायम कोंडीत सापडत असल्याचे ते म्हणाले. या आयटी पार्कच्या कर्मचाऱ्यांची भूक भागवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यातून रस्त्याच्या कडेलाच कचरा निर्माण होत आहे. एकीकडे अडवलेले रस्ते, तर दुसरीकडे चालण्यासाठी पदपथही गायब झाले आहेत. कारखान्यांच्या गेटसमोर गाड्या लावून ठेवणे, ट्रक आणि डम्पर रस्त्यावर उभे करणे ही रोजचीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळे माल घेऊन येणारे आणि घेऊन जाणारे ट्रक, कंटेनर कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशी मागणी अनेक उद्योग प्रतिनिधींनी या वेळी केली.

रुंदीकरणाचे अतिक्रमणवाले लाभार्थी
ठाणे महापालिकेने येथील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे, मात्र त्यामुळे कोंडी दूर होण्याऐवजी याचे लाभार्थी अतिक्रमण करणारे झाले आहेत. अशी खंत टीसाच्या माजी अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केली.

ठाणे पोलिसांचा ठोस कृती आराखडा
बैठकीदरम्यान उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी उद्योगांच्या चिंता गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन दिले.

असा निघणार तोडगा
वागळे इस्टेट परिसरात पी १, पी २ पार्किंग प्रणाली राबवली जाणार आहे. ज्यामुळे वाहनांच्या थांब्यांचे नियोजन सुकर होईल.
काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्याचा अभ्यास केला जाईल.
वागळे औद्योगिक क्षेत्रात चार वाहतूक पोलिस कायमस्वरूपी तैनात केले जातील. टीसाकडून चार स्वयंसेवक दिल्यास संयुक्त वाहतूक पथक तयार करण्यात येईल.
पुढील ४५ दिवसांत कारखान्यांच्या गेटसमोर पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येईल.

अतिक्रमण हटवणार
महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी हेमंत गोहिल यांनी दिली. रस्त्यांच्या कोपऱ्यांवरील हातगाडीवाले आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवून त्यांना नियोजित ठिकाणी हलविण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT