मुंबई

सायन-पनवेल हायवे होणार ग्रीन!

CD

क्राँक्रीटच्या जंगलातून हरितमार्ग
सायन-पनवेल महामार्गावर सव्वा लाख झाडांचे रोपण
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ६ ः पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. इमारती, रस्ते, उड्डाणपूल आणि विकासकामांसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल-सायन महामार्गावर सव्वा लाख झाडांच्या लागवडीचा पालिकेने निर्णय घेतला आहे.
पनवेल सायन महामार्ग कळंबोली येथून सुरू होतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण १२ वर्षांपूर्वी झाले आहे. त्यामध्ये अनेक झाडांचा बळी गेला होता, पण आता त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. महापालिका हद्दीत गेल्या दीड वर्षांत मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत, तर पनवेल-सायन महामार्गालगतचा परिसर हरितपट्टा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
----------------------------
लोकसहभागातून प्रकल्प
- पनवेल-सायन महामार्गा लगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करताना विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींबरोबर नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभागातून हा प्रकल्प होईल. या माध्यमातून पनवेल महापालिका वेगळेपण इतर स्थानिक स्वराज्य संस्था समोर ठेवणार आहे.
़़़़़़़- कळंबोली सर्कल ते बेलपाडादरम्यान जवळपास एक लाख २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षभरात हा महामार्ग हरितमार्ग म्हणून ओळखला जाणार असल्याचे वृक्ष प्राधिकरण समितीकडून सांगण्यात आले.
- पनवेल-सायन महामार्गालगत जवाहर रस्त्यालगत पनवेल पालिका हा प्रकल्प राबवणार आहे. लँडस्केप सादरीकरण योजना पूर्णत्वास आली आहे. त्याचबरोबर कृतिका जैन लँडस्केप आर्किटेक्ट यांनी प्रकल्पाचे रेखांकन केले आहे. एकूण ७,१३२ चौरस मीटरवर झाडांचे रोपण होणार आहे.
--------------------------------
वृक्षलागवडीची रचना
दाट लागवड - २,०८५ चौ. मी.
फुलांची लागवड - १,१६६ चौ.मी.
स्तरीय लागवड - १७०० चौ. मी.
जमिनीचे आवरण - ४६० चौ. मी.
झुडपे - ४०० चौ. मी.
लहान झाडांची लागवड - ८४० चौ. मी.
प्लाझा - १७० चौ. मी.
पदपथ - १०६२ चौ. मी.
मियावाकी लागवड - ६०० चौ. मी.
जमीन - ५५० चौ. मी.
एकूण - ७,१३२ चौ. मी.
-------------------------------------
पनवेल-सायन महामार्गाला हरित रूप देण्याचा संकल्प झाडे लावण्यापुरता मर्यादित नाही, तर शहराच्या श्वासाला नवी ऊर्जा देणे हा आहे. सव्वा लाख झाडांच्या संवर्धनामुळे पनवेलचा पर्यावरणीय समतोल अधिक बळकट होईल. लोकसहभागातून प्रदूषणमुक्त पनवेल घडवणे हेच उद्दिष्ट आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT