मुंबई

विद्युत खांब, ट्रान्सफर्मा बदलाचा भार पालिकेवर

CD

विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर बदलाचा भार पालिकेवर
७० कोटींचा पालिका करणार खर्च
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर वाढती वाहनांची वर्दळ, अवजड वाहनांची वाहतूक यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असते. यावर उपाय म्हणून मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी या मार्गात आलेले विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर विलीनीकरणात अडथळा ठरत आहे. त्यात हे विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर हटविण्याची मोठी कसरत एमएमआरडीएला करावी लागत असून, विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगच्या कामाला सुमारे ७० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. मात्र हा खर्च कोण उचलणार, याबाबतचा संभ्रम निर्माण झाला होता. त्यात आता विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा खर्च पालिका करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील घोडबंदर भागाची वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. घोडबंदर सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये विलीनीकरण करणे हे काम कापूरबावडी ते गायमुखपर्यंत १०.५० किमी अंतराचे आहे. घोडबंदर मार्गावरील या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामामध्ये तब्बल दोन हजार १९६ वृक्ष बाधित होणार असून, त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे. तर उर्वरित एक हजार ६४७ वृक्षांची तोड करण्यात येणार आहे. असे असले तरी दुसरीकडे आता महावितरणचे डीपी, विद्युत खांब आणि ओव्हरहेड वायर या कामात अडथळा ठरत आहे. कापूरबावडी ते गायमुख या १०.५० किमीच्या मार्गात सुमारे आठ ट्रान्सफॉर्मर तब्बल ४५च्या आसपास विद्युत खांब येत आहेत. हे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल आणि ओव्हरहेड वायर या कामात अडथळा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात यापूर्वी जून महिन्यात पालिका मुख्यालयात झालेल्या आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. हे शिफ्टिंग करण्यासाठी महावितरण आणि एमएमआरडीएमध्ये चर्चा सुरू असताना हे काम कोण करणार, याचा खर्च कोण करणार, असे प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान, नुकतेच घोडबंदर मुख्य रस्ता व सेवा रस्ता विलीनीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल आणि ओव्हरहेड वायर शिफ्टिंगबाबतदेखील चर्चा करण्यात आली. या वेळी ठाणे पालिकेला खर्च करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता पालिकेवर महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल आणि ओव्हरहेड वायर शिफ्टिंगसाठीचा ७० कोटींचा भार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT