एकाच वेळी पाच मित्रांचे मोबाईल चोरीला
ठाणे,ता.६ : झोपेतून उठल्यावर एका रात्रीत पाच मित्रांचे मोबाईल फोन चोरीला गेले, अशी घटना आझाद नगर, ठाण्यात समोर आली आहे. चोरीला गेलेले ५ मोबाईल फोन एकूण अंदाजे ७५ हजार रुपयांचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी तक्रारदार वारीसअली मोहम्मद उमर सिद्धिकी आणि त्याचे मित्र येथे राहायला आले होते. ०३ ऑक्टोबर रोजी दिवसभर कामावर गेलेल्यांनी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास झोपेत जाण्यापूर्वी रूमच्या खालून येणाऱ्या लोखंडी शिडीवरील जाळीच्या दरवाज्यावर कुलूप लावले होते.४ ऑक्टोबर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी मोबाईल फोन नसल्याचे लक्षात आले. बाहेर पाहिल्यावर जाळीवर लावलेले कुलूप तुटलेले दिसले, यावरून चोरी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. चोरीसंदर्भात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.