मुंबई

दिव्यांगांना विवाहास आर्थिक सहाय्य मिळणार

CD

दिव्यांगांना विवाहास आर्थिक सहाय्य मिळणार
ठाणे झेडपी राबविणार प्रोत्साहन योजना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : दिव्यांगबांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असतानाच, आता या कार्यलयामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येणार आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सामान्य कौटुंबिक जीवन जगता यावे तसेच दिव्यांग आणि अव्यंग व्यक्तींमध्ये विवाहास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने “दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना” लागू केली आहे. या योजनेनुसार, किमान ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेली वधू किंवा वर जर अव्यंग वधू/वराशी विवाह करत असतील, तर त्या नवविवाहित जोडप्यास शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१४ या आर्थिक वर्षापासून ते आता नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींशी विवाह करण्यास अव्यंग व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि समाजात दिव्यांगांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, असा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

असे मिळणार अर्थसहाय्य...
१. रक्कम रुपये २५०००/- चे बचत प्रमाणपत्र.
२. रुपये २००००/- रोख स्वरूपात.
३. रुपये ४५००/- संसारोपयोगी साहित्य/वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल.
४. रुपये ५००/- स्वागत संमारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.

- योजनेच्या अटी व शर्ती
१. वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे.
२. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३. विवाहीत वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्पोटित असल्यास अशा प्रकारची मदत पूर्वी घेतलेली नसावी.
४. विवाह हा कायदेशीर रीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.
५. विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

- योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१. विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे.
२. सिव्हील सर्जन यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला व वधू-वर एकत्रित फोटो.
३. विवाह नोंदणी दाखला.
४. दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्रे /डोमीसाईल / आधार कार्ड / पॅन कार्ड/एकत्रित बँक अकाउंट / ४ पासपोर्ट साईज फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT