मुंबई

विलंबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर तोडगा काढावा

CD

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील अनेक भागात तब्बल ६० ते ७० तासांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण व मिरा-भाईंदर महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यावर आयुक्तांनी एक संयुक्त बैठक बोलावून कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपचे मिरा-भाईंदर निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी केली आहे.

मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्तीसाठी अथवा अन्य कारणासाठी शटडाऊन घेतला जातो. त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो व शहरातील अनेक भागात दर आठवड्याला विलंबाने पाणी दिले जाते. उशीर होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या कारणांची नागरिकांना अपेक्षा नाही. त्यांना या समस्येवर तातडीने व कायमस्वरुपी उपाययोजना हवी आहे. यासाठी संबंधित अधिकारी, स्थानिक आमदार, मंत्री यांनाही निमंत्रित करावे. या समस्येचे मूळ शोधून त्याचे समाधान करण्यात यावे, असे त्यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply Close : पुणेकरांनो! संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद

Gautami Patil: ''गौतमी पाटीलच्या जीवाला धोका..'' पोलिसांच्या नोटिशीला गौतमीचं उत्तर

Latest Marathi News Live Update : वाघोलीत मिरवणुकीदरम्यान शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Hingoli: चक्क शिक्षणाधिकारीच बसणार शाळेसमोर उपोषणाला; कारण वाचून धक्का बसेल...

Indian Railways Confirm Ticket : रेल्वेकडून प्रवाशांना लवकरच मिळणार Good News! आता ‘कन्फर्म’ तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलता येणार

SCROLL FOR NEXT