एनएमआयएमएसच्या एमबीएसाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
मुंबई, ता. ७ : एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी नोंदणी १० ऑक्टोबर रोजी बंद होत असून, विद्यार्थ्यांनी त्वरेने नोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ही जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त बी स्कूल आहे. येथील एमबीए अभ्यासक्रम हा उद्योग संबंधित ज्ञान, चांगल्या नोकऱ्या, जागतिक दर्जाचे शिक्षण तसेच अनुभवासाठी ओळखला जातो. सध्याच्या व्यावसायिक आव्हानांच्या युगात एमबीए हे नेतृत्व आणि कारकिर्दीच्या प्रगतीसाठी सर्वात शक्तिशाली प्रमाणपत्र आहे. एनएमआयएमएसच्या एमबीएमध्ये विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान, जागतिक अनुभव आणि व्यावहारिक अनुभव मिळतो.
एनएमआयएमएस ही एएसीएसबीद्वारे मान्यता मिळालेली पश्चिम भारतातील पहिली बी स्कूल आहे. ईक्यूयुआयएसने मान्यता दिलेल्या भारतातील पहिल्या सात शाळांपैकी ती आहे. त्यांचे उद्योग समूहांशी असलेले मजबूत संबंध आणि जागतिक दर्जाचे शिक्षक विद्यार्थ्यांना नेतृत्व भूमिकेसाठी तयार करतात. एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या कोणत्याही कॅम्पसमध्ये एमबीए अभ्यासक्रमात नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० ऑक्टोबरपूर्वी https://sbm.nmims.edu/ या संकेतस्थळावर फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.