मुंबई

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित होणार

CD

माहीम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित होणार
ॲड. आशीष शेलार यांची माहिती
मुंबई, ता. ९ ः माहीम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात येत्या आठवड्यात बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज येथे दिली.
मंत्री आशीष शेलार यांनी माहीम किल्ला परिसराला भेट देऊन पाहणी केली. या वेळी मुंबई महापालिकेचे अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका हेरिटेज विभागातील कन्सल्टंट, अधिकारी, मुंबई पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
माहीमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुरातन वास्तू असून तेराव्या शतकामध्ये राजा बिंबाराजाने बांधलेलं मूळचं हे स्ट्रक्चर, हा किल्ला आहे. चौदाव्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यावर हल्ला केला. सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला उभा केला, तो आजचा हा माहीमचा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथून जवळच वांद्रेचा आणि वरळीचा किल्लासुद्धा आहे. या वास्तूमध्ये वर्षानुवर्षे खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत होते. मुंबई महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणापासून मुक्त करण्याचे काम केले. त्यामुळे माहीमचा किल्ला आज मोकळा श्वास घेतो आहे. यापुढे किल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण करण्यात येणार असून मुंबई महापालिका आणि पुरातत्त्व खात्यातर्फे हे काम करण्यात येणार आहे.
जवळजवळ एक एकरमध्ये असलेला हा पूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा, असा तीन एकर समुद्रकिनारा असलेला हा परिसर आहे. या सगळ्यांचा एकत्रित विकासाचा कार्यक्रम, धोरण आणि योजना मुंबई महापालिकेच्या नेतृत्वामध्ये संपूर्णता करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही आशीष शेलार यांनी जाहीर केले.

मुंबईकरांना विकासाच्या प्रगतीबरोबर आपला वारसा असलेल्या गोष्टींचीसुद्धा इत्थंभूत माहिती व सुविधा देणे हेच धोरण सरकारचे आहे. माहीम किल्ल्याच्या संवर्धनासाठी पालिका, पुरातत्त्व विभाग काम करणार आहे.
- ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

Panchang 10 October 2025: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Railway Megablock: मध्य रेल्वेवर १९ तासांचा जम्बो ब्लॉक! लोकलसह अनेक गाड्या रद्द; वाचा सविस्तर

IND vs WI 2nd Test Live : आजपासून दुसरा कसोटी सामना; विंडीजकडून माफक लढतीची अपेक्षा, कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT