मुंबई

आता खड्डयांसह धुळीचा सामना

CD

आता खड्ड्यांसह धुळीचा सामना
श्वसनाचे आजार वाढीस; वाहनचालकांसह नागरिक हैराण
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा दिखावा अलिबाग-वडखळ, रोहा मार्गावर करण्यात आला. परंतु आता पाऊस थांबला असल्याने धुळीचे कण नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांसह चालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे खोकला, सर्दी, घसा दुखण्यासारखे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या धुळीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
तालुक्यातील विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अलिबाग-वडखळ, अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी पावसाळ्यापूर्वी खड्डे पडले होते. पावसाळ्यात माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभामार्फत करण्यात आले. पावसाळ्यात चिखलातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. या मार्गांवर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू आहे. आता पाऊस थांबल्याने या वर्दळीमुळे रस्त्यांवरील खडी, धूळ उडत आहे. या धुळीचे कण अनेकांच्या नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे काही जण नाक दाबून तर काही जण तोंडाला कपडा बांधून प्रवास करीत आहेत. दुचाकीचालकासह तीनचाकी, चारचाकी चालकांना आणि पादचारी प्रवाशांना या धुळीचा त्रास होत आहे. काहींना सर्दी, खोकला, घसा दुखण्याचे आजार होऊ लागले आहेत. सरकारी दवाखान्यांसह खासगी दवाखान्यात या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे. तसेच पर्यटकही आता अलिबागला येऊ लागले आहेत. परंतु, मातीचे कण व धुळीमुळे प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
............................
प्रतिक्रिया :
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. त्याबाबत लेखी पत्र दिले आहे. लवकरच रस्त्यांची योग्य दुरुस्ती केली जाईल.
- एम.एम. धायतडक, कार्यकारी अभियंता, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या....

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT